राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबई, पुणे अजिंक्य

  • Written By: Last Updated:
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबई, पुणे अजिंक्य

नगर : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर संघाने अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहरने अहमदनगरला ३२ विरुद्ध ३१ असे एका गुणाने हरवले. महिला गटात एका गुणाच्या फरकाने पुणे संघ अजिंक्य ठरला. ही स्पर्धा अहमदनगर शहरात सुरू होत्या.

दोन्ही सामने रोमहर्षक झाले. महिलांच्या गटात मुंबई शहरला पुण्याने हरवले आणि अवघ्या एका पॉईंट ने 30-29 असा विजय मिळवला. आमदार निलेश लंके, शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शशिकांत गाडे, माजी आमदार दादा कळमकर, प्रकाश बोरुडे, जयंत वाघ, महापौर रोहिणी शेंडगे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube