‘त्याने एकट्यानेच वर्ल्ड कप जिंकला’; धोनीच्या विषयावरुन हरभजन संतापला

‘त्याने एकट्यानेच  वर्ल्ड कप जिंकला’; धोनीच्या विषयावरुन हरभजन संतापला

Harbhajan Singh On Dhoni :  WTC फायनलमध्ये भारतीयसंघाला सलग दुसऱ्यावेळेस पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघावर सर्वत्र टीकेची झोड उडवली जात आहे. भारताल सलग दुसऱ्या वेळेस फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. यापूर्वी न्यूझीलंडसोबत झालेल्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

एका यूजरने या पराभवानंतर महेंद्र सिंह धोनीची आठवण काढत एक ट्विट केलं. त्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने जोरदार उत्तर दिले. यानंतर हरभजनला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यामुळे देखील अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते.

काय म्हटले होते यूजरने

कोच नव्हता, मेंटॉर नव्हता, फक्त युवा खेळाडू होते. कारण सिनियर खेळाडूंनी नकार दिला होता. एकाही मॅचमध्ये कॅप्टनशिपचा अनुभव नाही. मात्र, तरीही धोनीने त्यावेळचा मजबूत संघ ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये हरवलं. कॅप्टनशिपची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 48 दिवसात धोनीने हे करुन दाखवलं, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

हरभजन सिंहचे उत्तर 

हा, का नाही, ज्यावेळी तो भारतासाठी खेळत होता, तेव्हा फक्त एक युवा मुलगाच खेळत होता. अन्य 10 प्लेयर नव्हतेच. त्याने एकट्यानेच सर्व वर्ल्ड कप ट्रॉ़फी जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया किंवा दुसरे देश वर्ल्ड कप जिंकतात, तेव्हा त्याचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं जातं. पण टीम इंडियाच्या विजयानंतर फक्त कॅप्टनचीच चर्चा होते. क्रिकेट एक टीम गेम आहे, ज्यात जय-पराजय एकत्र असतो, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

दरम्यान, यानंतर हरभजनला जोरदाट ट्रोल करण्यात आले. हरभजनचे वक्तव्य धोनीच्या फॅन्सला अजिबात आवडले नाही. काहींना त्याला तू धोनीवर जळतोस असे म्हटले तर काहींनी दुसऱ्याच शब्दात सुनावले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube