WTC Final 2023 : रोहित शर्माचं कसोटी सामन्यांचं अर्धशतक
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टनने मैदानावर पाऊल ठेवताच एक नवीन विक्रम केला आहे. खरंतर, रोहित शर्माचा हा 50 वा कसोटी सामना आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (wtc-final-2023-rohit-sharma-50th-test-match-for-india)
विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक सामन्यात भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आपला 50 वा कसोटी सामना खेळत आहे.
रोहित शर्माने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. 2018 मध्ये रोहित शर्माला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये रोहितने सलामीवीर म्हणून पुनरागमन केले. कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माकडे वनडे आणि कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले.
रोहित शर्माने 49 कसोटी सामन्यांच्या 83 डावांमध्ये 45.66 च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. रोहितची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 212 आहे. रोहितच्या नावावर भारतात 8 शतके आणि 6 अर्धशतके आहेत. त्याचबरोबर त्याने परदेशी भूमीवर झळकावलेले 1 शतक ओव्हलच्या मैदानावरच झळकावले आहे.
रोहितने इंग्लंडमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. सहा सामन्यांमध्ये त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 42.36 च्या सरासरीने 466 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याची सर्वोत्तम धावसंख्या 127 आहे.