विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातून व्हिडीओ व्हायरल; प्रकृतीबाबत चाहत्यांना चिंता

Vinod Kambli Viral Video माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील VIDEO व्हायरल; सुविधांचं केलं कौतुक, मात्र प्रकृती पाहून चाहते चिंतेत.

Vinod Kambli Viral Video

Vinod Kambli Viral Video: माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कांबळी एका सेंटरमध्ये दिसत असून, त्यांनी तिथे मिळणाऱ्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर हादरलं! वृद्धाचा सहकाऱ्यांवर हल्ला दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर… वृद्धाश्रमात हत्याकांड कसं घडलं?

व्हिडीओमध्ये कांबळी म्हणतात, “मी विनोद कांबळी. आणि मी निदान सेंटरमध्ये आहे.” यानंतर त्यांनी सेंटरमधील सुविधांचं कौतुक केलं. “निदानमध्ये खूप चांगली सुविधा मला मिळाली आहे. हायजीन वगैरे सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे,” असं ते म्हणाले.

या सेंटरमध्ये आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही कांबळी यांनी भावना व्यक्त केल्या. “इथे कधीही असं वाटत नाही की मी घरी नाही. आणि जे लोक इथे आहेत, त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं आहे,” असं त्यांनी सांगितलं.

व्हिडीओच्या शेवटी कांबळी यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले. दरम्यान, व्हिडीओमध्ये बोलताना त्यांची जीभ काहीशी अडखळताना दिसत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांकडून कांबळी लवकर बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.

follow us