- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
Manoj Jarange : गाडी नसेल तर एसटीचे तिकीट काढून देतो; एकदाही भेट न घेतल्याने जरांगेंचा अजित पवारांना टोला
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली आहे. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे […]
चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न […]
आणखी एका काकांविरोधात शड्डू; अजितदादांच्या गटातील आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात
तळेगाव : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचे पुतणे शैलेश मोहिते (Shailesh Mohite) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात हाती शिवबंधन बांधले. शैलेश मोहिते यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये (NCP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. 2021 मध्ये आमदार मोहिते यांना […]
Ram Mandir : CM शिंदे एकटे नाही तर मंत्रिमंडळालाच नेणार; अयोध्या दौऱ्याचं प्लॅनिंग काय?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), […]
दिलासादायक बातमी ! पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार
Traffic changes announced at Pune University Chowk : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार काही मार्गावर वाहतूक वळविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे (Mla Siddharth Shirole) यांनी बैठकीत काही […]
एक किंवा दोन अपत्यांबाबत अजितदादा आग्रही; घरांचं कारण पुढे करत सांगितलं वास्तव
Ajit Pawar : ‘मी 1991 मध्ये ज्यावेळी पिंपरी-चिंचवडमधून पहिल्या वेळेस खासदार झालो त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबलं पाहिजे. नाहीतर ब्रह्मदेव जरी आला तरी सगळ्यांना घरे बांधून देऊ शकणार नाही. सरकारबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार […]
माजी टीकाकार मूग मिळून गप्प; अजितदादांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत आव्हाडांची खोचक टीका
Jitendra Awhad on Ajit Pawar: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंड करून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला आहे. तेव्हापासून दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवारांचा (Ajit Pawar) जुना व्हिडिओ करून त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. याच व्हिडिओवरून शरद पवार गटाचे आमदार […]
पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?
Ajit Pawar in Pimpri Chinchwad : एखादा मोठा नेता किंवा मंत्र्याचा दौरा असला की पोलिसांचा बंदोबस्त असतोच. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असल्याने सर्वसामान्यांना कोसो दूर ठेवण्याची रणनिती आखली जाते. सामान्य लोकांचे समजू शकते पण, असाच प्रसंग पत्रकारांच्या बाबतीत घडला तर. होय, असा प्रसंग पत्रकारांच्याच बाबतीत घडला आहे अन् तोही चक्क अजितदादां समोर. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या […]
‘ज्यांनी राजकारणात आणलं त्यांनाच सोडून गेले, अजित पवार धोकेबाज’; नाथाभाऊंचा घणाघात
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]
घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा; सुनील तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : आगामी काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या निवडणुकांसाठी आता तयार सुरू केली आहे. दरम्यान, आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं. Share Market : […]