- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय
Madha Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर […]
फडणवीसांनी हनुमंताकडं काय मागितलं?, म्हणाले आमच्यासाठी बुद्धी तर विरोधकांसाठी…
Devendra Fadnavis : देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र जे ते नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यामध्ये सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर जोरदार फटकेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, विरोधक आता टीका करताना एकदम शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. (Loksabha Election) त्यांनी आज नागपूर येथे गवळीपुऱ्यातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. […]
अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात […]
फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…
Aditya Thackeray Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रचार सभा आणि मेळाव्यांतून राजकीय वातावरण ढवळू लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही चांगल्याच गाजत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी एका (Uddhav Thackeray) मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Devendra Fadnavis) खळबळजनक दावा केला होता. फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून दिल्लीला […]
दोन आमदार अन् एका राज्यसभा खासदाराने गेम केला; फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी सांगितलं
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्यापाही काही जागांबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असून, छ.संभाजीनगरमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरूवात झाली असून, ही नाराजी भाजप-शिवसेनेला निवडणुकांमध्ये डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये यासाठी दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने खेळी केल्याचे विनोद पाटील (Vinod Patil) […]
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलं? बच्चू कडू म्हणाले, ‘मी त्यांचा आभारी…’
Bachchu Kadu on Devendra Fadnavis : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तर बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दर्यापूरमध्ये नवनीत राणांसाठी प्रचारसभा […]
इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) हिंगोलीचे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर (Baburao Kadam Kohlikar) जोरदार टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, त्यात तुम्हाला बसायला जागा नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, […]
आदित्य ठाकरेंची लायकी काय? बावनकुळेंची ठाकरे पिता-पुत्रावर आक्रमक टीका
Chandrashekhar Bawankule : सुमारे 25 वर्ष ज्यांची नैसर्गिक युती होती त्या भाजप आणि शिवसेना (उबाठा)मधून सध्या वि स्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. 2019 ला अनपेक्षितपणे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून कुणी कुणाला फसवलं याचे जोरदार वार प्रतिवार सुरू झालेत ते आणखीही सुरूच आहेत. नुकतंच (Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे […]
‘पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न पण, मोदी-शहांनी पंख छाटले’; राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut comment on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनका दावा केला आहे. ज्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान होण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले, […]
‘उगाच स्क्रिप्ट करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर देऊ’; फडणवीसांचं ठाकरेंना तिखट उत्तर
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या सभांतून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर (Uddhav Thackeray) भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. काल एका सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नालायक आणि […]