Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणासाठी राज्य (Maratha Reservation) सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. या दोन्ही […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Vijay Wadettivar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद […]
Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (Lok Sabha Election 2024) आणि महायुती या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधीच आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर […]
Nana Patole : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Sadaverte) यांनी थेट मनोज जरांगे-पाटील […]
Sanjay Raut on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknath Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Maratha Reservation : ‘मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला गोरगरीब मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची शपथ मी घेतली होती. आज ती शपथ पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतोय. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. सरकारने आज जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार करणार […]
नवी मुंंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत कूच केलेल्या मनोज जरांगे (Manoj Jaramge) यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. विजयी सभेला संबोधित करताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. मात्र, हे आभार मानताना त्यांनी काढलेला हा अध्यदेश टिकवण्याची आणि लावून धरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या अशी […]