Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज मालवणच्या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गद्दारांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करण्यासाठी मविआ सरकार पाडलं. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा त्यांनी केली. तर दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवण्याची […]
मुंबई : येथील महालक्ष्मी रेसकोर्सबाबत शिंदे सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांनंतर वाद पेटला आहे. या दोन्ही निर्णयांना विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. या निर्णयांवरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला, सोबतच या निर्णयांना भाजपचे समर्थन आहे की विरोध याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही दिले […]
Chhagan Bhujbal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. […]
Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या (Ganpat Gaikwad) गोळीबारात शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रुग्णालयात […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत […]
Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो […]
Parashuram Financial Corporation : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील समस्त ब्राह्मण समाजाकडून स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती. ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने वारंवार सरकार दरबारी ही मागणी रेटून धरली होती. काहीच दिवसांपूर्वी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. स्वतंत्र परशुराम आर्थिक महामंडळ (Parashuram Financial Corporation) स्थापन करावे, […]
राज्यसभेची निवडणूक म्हटले की सर्वांना आठवते 2017 मधील गुजरातची आणि 2022 मधील महाराष्ट्रातील निवडणूक. एखाद्या वेबसिरीजलाही मागे टाकेल एवढा सस्पेन्स, ड्रामा, थ्रिलर आणि त्यानंतर लागलेला निकाल अशा गोष्टी या दोन्ही निवडणुकांमध्ये होत्या. आताही पुन्हा एकदा देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका […]
मुंबई : महापालिकेकडून विरोधी पक्षातील आमदारांना एकही न रुपया मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. “यात महानगरपालिकेची त्यात काही चूक नाही. आयुक्तांना अधिकार ठेवले नाहीत. ते बाहुले झाले आहेत. नगरविकास खात्याने इशारे करायचे आणि आयुक्तांनी नाचायचे सुरु आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांनी या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री, […]