भारताने स्क्वॉश वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं, 29 वर्षात ऐतिहासिक कामगिरी

भारताच्या पहिल्या स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जोशना चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 15T221824.168

चेन्नईत भारताने 14 डिसेंबर रोजी झालेल्या स्क्वॉश वर्ल्डकप स्पर्धेच्या (Sports) अंतिम सामन्यात हाँगकाँगला 3-0 ने पराभूत कररत ऐतिहासिक कामगिरी केली. 1996 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या २९ वर्षांच्या ऐतिहासात भारताने स्क्वॅश विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे.

भारतीय संघाने मिश्र सांघिक स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद जिंकले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या भारतीय संघाने एकही सामना न गमावता विजेतेपद जिंकलं. भारतीय संघाने गट फेरीत स्वित्झर्लंड आणि ब्राझीलचा 4-0 असा पराभव करून दमदार सुरुवात केली. भारताने क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा, सेमीफायनलमध्ये भारताचा सामना दोन वेळा विजेता असलेल्या इजिप्तशी झाला. या सामन्यात भारताने 3-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट,मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पाहा फोटो

भारताच्या पहिल्या स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जोशना चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी 2023 च्या स्क्वॅश वर्ल्ड कपमध्ये भारताचे विजेतेपद थोडक्यासाठी हुकले होते. त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इजिप्त सारख्या संघांनी हे विजेतेपद जिंकले आहे.

चेन्नई येथे झालेल्या स्क्वॅश विश्वचषकात पाच उपखंडातील 12 संघांनी भाग घेतला होता.ऑस्ट्रेलिया, इजिप्त, हाँगकाँग, जपान, मलेशिया, इराण, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या बलाढ्य देशांचा समावेश होता. भारतीय संघाने वर्चस्व राखत या क्रीडाप्रकारात नवा अध्याय लिहिला आहे. आता या स्पर्धेतील निश्चितच फायदा होणार आहे. भारताला मिळालेला विजय निश्चितच आनंदाचं कारण आहे. कारण लॉस अँजेलिस 2028 मध्ये स्क्वॅश क्रीडा प्रकार आहे. त्यामुळे भारताला या विजयामुळे बळ मिळणार आहे.

 

follow us