जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच आम्हाला द्या; रामदास कदमांची जागा वाटपाबाबत जाहीर भूमिका

जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच आम्हाला द्या; रामदास कदमांची जागा वाटपाबाबत जाहीर भूमिका

Ramdas Kadam : जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच आम्हाला द्या, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलीयं. दरम्यान, याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महायुतीतील शिवसेना सर्वात मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता रामदास कदम यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीयं.

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची व्हीव्हीपॅट पडताळणीची याचिका फेटाळली

रामदास कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेच्या सिटींग जागा बदलल्याने आम्हाला फटका बसला आहे. शिवसेनेच्या 3 ते 4 वेळा खासदारांच्या जागा बदलायला लावल्या होत्या. आता तुमचा भाऊ म्हणून आम्ही ज्या विश्वासाने तुमच्याकडे आलोयं, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ…जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच जागा आम्हाला द्या, अशी मागणी रामदास कदम यांनी केलीयं.

“माझं मोदींशी भांडण नाही पण..” शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला युतीतील कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार यावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण? यावरून वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दाखल देत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई यांनी आपणच महायुतीत मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता रामदास कदमांनी थेट समसमान जागा देण्याची मागणी केलीयं.

थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला

दरम्यान, महायुतीतील मोठा भाऊवरुन सुरु असलेल्या दावा शिंदे गटाच्याच नेत्यांने खोडल्याचं दिसून आलं होतं. महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं होतं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे नेते असल्याचं निरुपम यांनी स्पष्ट केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज