थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला

थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला

Ramdas Kadam Criticize BJP and Ajit Pawar : एकनाथ शिंदे यांचे उमेदवार दोन महिने अगोदर घोषित केले असते तर आज चित्र वेगळे दिसलं असतं. तसेच अजित पवार (Ajit Pawar) महायुतीमध्ये अजून थोडे दिवस नसते आले. तरी चाललं असतं. असं शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. ते आज (19 जून) मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

‘पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा म्हणतात’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

यावेळी बोलताना रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री म्हणून ते करत असलेल्या कामाचं कौतुक केलं. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं देखील कौतुक केलं. मात्र यावेळी ते म्हणाले की, मागून आलेल्या अजितदादांचं देखील अभिनंदन. पण अजित पवार महायुतीमध्ये अजून थोडे दिवस नसते आले. तरी चाललं असतं. असं म्हणत त्यांनी एक प्रकारे महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

जरागेंचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप, राहुल गांधी PM झाले असते तर…; पटोलेंचा हल्लाबोल

त्याचबरोबर भाजपवर नाराजी व्यक्त करताना कदम म्हणाले की, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफिल राहता कामा नये. मात्र एकनाथ शिंदे यांना हात जोडून विनंती आहे की, भाजपच्या नेत्यांना सांगा की, जसे भाजपचे उमेदवार दोन महिने अगोदर दिले तसे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार दोन महिने अगोदर घोषित केले असते तर आज चित्र वेगळे दिसलं असतं. हे मोदी आणि शाह यांना देखील सांगा अन्यथा त्यांच्याकडे हे सांगण्यासाठी मला घेऊन चला.

कारण त्यामुळेच भावना गवळी हेमंत गोडसे हे दिल्लीत जाऊ शकले नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला की भाजपचे मंडळी आमची जागा आमची जागा म्हणत होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी आणि शाह यांना सांगा की आम्हाला शंभर उमेदवार द्या आम्ही 90 निवडून आणतो. असं म्हणत रामदास कदम यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला महायुतीमध्यें 100 जागा दिल्या जाव्यात अशी मागणी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज