‘पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा म्हणतात’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

‘पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा म्हणतात’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यसह उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी या मेळाव्यात नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नेहमी पुन्हा येईन येईन म्हणणारे आता काय म्हणतायत? जाऊद्या ना घरी, आता वाजवले की बारा..आता एवढे बारा वाजवले आहेत असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लबोल केला. तर दुसरीकडे या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. फक्त मी नको म्हणून काही लोकांनी मोदींना बिन शर्ट पाठिंबा दिला होता. होय, उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट पाठींबा,बघा मी उघड पाठिंबा देतो म्हणाले फक्त उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत जर तुम्ही षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. असा आव्हान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा असं देखील ठाकरे म्हणाले.

सत्तेसाठी भाजपने हिदुत्व सोडले

तर फक्त सत्तेसाठी भाजपने हिदुत्व सोडले आहे अशी टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेसाठी भाजपने हिदुत्व सोडले आहे. 2014 च्या त्यांच्या सरकारचा फोटो पाहा आणि 2024 चा सरकारचा फोटो पाहा. त्यांच्या सरकारमध्ये आता किती हिदुत्वादी आहे? चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे हिंदुत्वादी आहे का? असा सवाल देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला तसेच तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व का ? सोडले याचा उत्तर द्या अशी मागणी देखील त्यांनी या मेळाव्यात बोलताना केली.

शिवसेना संपविण्याचे प्रत्यन अनेकदा झाले मात्र सर्वांना आम्ही पुरून उरलो आहोत. तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आणि ज्यांनी शिवसेना फोडली,  त्या नालायकांसोबत आम्ही जाणार नाही असं म्हणत शिवसेना एनडीए सोबत जाणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

मिंदेला बाजूला ठेवा अन्… भरसभेत उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

या मेळाव्यात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते भास्कर जाधवसह मोठ्या संख्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube