- Home »
- Loksabha Election 2024
Loksabha Election 2024
देशाला परिवर्तनं हवंय! मोदींची शक्ती कमी करणं देशाची गरज…; पवारांचे टीकास्त्र
Sharad Pawar On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपने चारशे पारचा नारा दिल्यानं विरोधकांकडून मोदींवर सातत्याने टीका केली जाते. भाजपला संविधान बदलायचं असल्यानं त्यांनी चारशे पारचा नारा दिल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींवर (PM Narendra […]
जानकरांसाठीची ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसी सफल; माढ्याची ‘गुड न्यूज’ संध्याकाळी सात वाजता सांगणार
नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या […]
चार्टर्ड प्लेन अन् दिमतीला खास नेते, उत्तम जानकरांच्या मनधरणीसाठी दिल्लीपर्यंत खास नियोजन
मुंबई : धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे माढ्यात भाजपची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव सुरू झाली असून, भाजपचे माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) भाजप आणि फडणवीसांनी खास नियोजन केले आहे. जानकरांना फडणवीसांनी खास चार्टर्ड […]
विशाल पाटील लढले तर पाठिंबा देऊ…; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं!
Prakash Ambedkar on Sangali Loksabha : सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचे सांगून त्यांनी या जागेवर शड्डू ठोकला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर […]
10 वर्षात मोदींनी फक्त उद्योगपतींसाठी सरकार चालवलं; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
Rahul Gandhi on PM Modi : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. साकोलीत झालेल्या प्रचारसभेत बोलतांना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार […]
Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत
Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर […]
काहींनी उघड पाठिंबा दिला, तर काहींनी लढण्याचं नाटक…; उद्धव ठाकरेंची मनसे-वंचितवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. त्यावर आता ठाकरे गटाचे […]
जनता जनार्दन मोदींच्या ‘गॅरंटी’वर खूश पण…; मोठ्या सर्व्हेक्षणात मतदारांनी मनातलं सांगितलं!
Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर […]
पडद्यामागचं राजकारण! भाजपात फडणवीस विरूद्ध सगळे; नेमकं काय घडतंय
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास […]
फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, सीएम शिंदेंचे टीकास्त्र
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) आज हिंगोली लोकसभा उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडल्याची टीका त्यांनी केली. जास्त परताव्याचं […]
