फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, सीएम शिंदेंचे टीकास्त्र

फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, सीएम शिंदेंचे टीकास्त्र

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) आज हिंगोली लोकसभा उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडल्याची टीका त्यांनी केली.

जास्त परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक, कोट्यावधी रुपये घेऊन वैभव कोकाटे पसार 

या सभेला संबोधित करतांना सीएम शिंदे म्हणाले, मी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. सामान्य कुटुंबातून आलो असूनही मुख्यमंत्री झालो. सामान्य माणूस मोठा झाला की त्याला सर्वसामान्यांच्या वेदना कळतात. त्यामुळे बाबुराव कदम हेही प्रामाणिकपणे काम करतील. गेल्या निवडणुकीत त्यांचा अल्प फरकाने पराभव झाला होता. ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले असते तर त्यांचा पराभव झाला नसता. त्यावेळी मी त्या प्रक्रियेत होतो, पण जेव्हा फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी बाबुराव कदम यांचे तिकीट कापले, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार; धनंजय महाडिकांचे मतदारांना प्रलोभन 

शिंदे म्हणाले, त्यांना प्रत्यक्ष फिल्डवरची परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे अनेकांचे तिकीट कापले गेले. अनेक कार्यकर्ते वंचित राहिले. त्यामुळेच मी दीड वर्षांपूर्वी बंड करण्याचे धाडस केलं. शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हे सरकार स्थापन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. खरे तर हे 2019 मध्येच व्हायला हवे होते. मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, त्यामुळं दीड वर्षापूर्वी त्यांचा टांगा पलटी करावा लागला, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

त्यांचा ज्योतिषी कच्चा निघाला
ते पुढे म्हणाले, आता अजित पवार महायुतीसोबत आले आहेत. मनसेही आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे सरकार मजबूत झाले आहे. आज सरकार पडेल, उद्या पडेल, असे ते (ठाकरे गट) सांगत होता. पण त्यांचा ज्योतिषी कच्चा निघाला, असा टोलाही त्यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज