मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.