राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे थैमान सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात अतिमुसळधार (Pune Rains) पाऊस झाला.
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यात जोरदार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.