पुण्यात रात्रभर संततधार, नाशकात ‘कोसळ’धार, विदर्भात ‘जोर’धार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुण्यात रात्रभर संततधार, नाशकात ‘कोसळ’धार, विदर्भात ‘जोर’धार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rains : राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे थैमान (Maharashtra Rains) सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात अतिमुसळधार (Pune Rains) पाऊस झाला. या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरात पावसाने हजेरी (Heavy Rains) लावली आहे. काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. त्यानंतर पुणे आणि शेजारच्या सातारा जिल्ह्यांना (Satara Rains) रेड अलर्ट जारी करण्यात आला (Red Alert) आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला अतिमुसळधार (Nashik) पावसाने झोडूपन काढले आहे. नाशिकमध्ये इतका पाऊस झाला आहे की गोदावर नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

पुण्यात कालपासून पाऊस होत आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता २९ हजार ४१४ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता आहे.

पुढील 4 – 5 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 24 ते 48 तासात मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कतेची इशारा देण्यात आलाय. पुणे, सातारा, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.

नाशकात कोसळधार, गोदावरीला पूर

नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 48 तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पाऊस होत आहे. या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाचा फटका नागरिकांनाही बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने या परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या भागातील दुकाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास फार वेळ लागणार नाही.

विदर्भात जोरधार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube