मुंबई : नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांतच निवडणूक जाहीर होणार आहेत. […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha 2024) आहेत. राज्यात ज्या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्तही केली आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एन्ट्री घेतली आहे. […]
Sanjay Raut : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून पहिली ठिणगी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टाकली आहे. टेस्ला, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे 17 प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातला गेले. हे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले. याला दरोडेखोरी […]