- Home »
- NCP
NCP
Lok Sabha 2024 : तनपुरे लागले तयारीला.. सुजय विखेंना मिळणार तगडी फाईट?
Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे […]
NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून लोकसभेची मांडणी?
NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर […]
‘संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी’.. अजितदादा गटाच्या आमदाराचा पलटवार
Amol Mitkari replies Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील शेतकरी आक्रोश मोर्चाची काल सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर पलटवार करत संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी झाली असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !
Rohini Khadse On Sheetal Mhatre : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे (Rohini Khadse) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी खडसे यांनी म्हात्रे (Sheetal Mhatre) यांची भीडभाडच ठेवलेली नाही. शीतल म्हात्रे आपले चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. […]
Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही…
पुणे : मी कृषीमंत्री असताना लातूरमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. त्यानंतर तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. सावकारीचे प्रकरण असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन रिझर्व बँकेतून देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर 72 हजार कोटी कर्ज माफ केले. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी टीका […]
अजितदादा बोलतात ते करतातच! आता कोल्हेंचं काय होईल? अनुभव सांगत विजय शिवतारेंचं उत्तर
पुणे : अजितदादांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. पण अमोल कोल्हेंचे काय होईल हे भाकीत वर्तविणे योग्य नाही. मात्र एक सांगू शकतो की शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा आणि निवडणुकीत पडल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात केलेले काम यामुळे वारे त्यांच्या दिशेने आहे. मात्र ती जागा कोण लढविणार, काय करणार याबाबत आमचे तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, […]
आता 10 महिने बारामतीतच मुक्काम ठोकणार! सुप्रियाताईंनी घेतला दादांचा अन् भाजपचा धसका?
बारामती : “पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे, या काळात मुंबईलाही जाणार नाही, मी माझ्या घरच्यांना सांगितले आहे, 10 महिने तुमचे तुम्ही बघा” अशी मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या दौंड येथील जाहीर सभेत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि […]
…म्हणून Nitin Gadkari यांचं सुप्त आकर्षण वाटत; जयंत पाटलांकडून गडकरींवर स्तुतीसुमनं
Nitin Gadkari : भाजपनेते नितिन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवार गटाला विरोध करणाऱ्या पाटील यांनी गडकरींची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. काय […]
‘…तर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफीची’; सुप्रिया सुळेंनी ठणकावूनच सांगितलं
Supriya Sule News : आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफी असेल, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule News ) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादीच्या (Ncp) नेतृत्वाखाली तीन दिवसीय शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे बडे नेते सामिल झाल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चादरम्यान सुप्रिया सुळेंनी संवाद साधला आहे. […]
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
Supriya Sule On Devedra Fadnvis : दिल्लीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांचा अपमान केला जातोयं, मराठी माणसाचा दिल्लीत अपमान होतो, याची अस्वस्थता वाटत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांसाठी मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी […]