Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]
Praniti Shinde On Ashok Chavan : भाजपकडून माईंड गेम खेळलं गेलंय ते मी रेकॉर्डवर आणू शकत नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याची पोलखोल केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपनेही तयारीची लगबग सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाची रचना आणि येथील सध्याची स्थिती तसेच या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे? याबद्दलचाच आढावा देणारा हा व्हिडिओ.
अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]