Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुंबईकडे मार्गक्रमण सुरू केले आहे. नगरमधील मुक्कामानंतर आता मनोज जरांगे पाटील लाखो समाजबांधवांसह लवकरच पुण्यात पोहोचणार आहेत. महायुती सरकारने मांडलेला तीन कलमी प्रस्ताव (Maratha Reservation) त्यांनी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले […]
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा काढला आहे. बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेला हा मोर्चा पुण्यातून जाणार आहे. आज (23 जानेवारी) ही पदयात्रा रांजणगावहून कोरेगाव पार्कमार्गे खराडी येथे पोहोचणार आहे. जरंगे पाटील यांचा खराडी येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर उद्या (24 जानेवारी) लोणावळा […]
Ajit Pawar : ‘मी 1991 मध्ये ज्यावेळी पिंपरी-चिंचवडमधून पहिल्या वेळेस खासदार झालो त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबलं पाहिजे. नाहीतर ब्रह्मदेव जरी आला तरी सगळ्यांना घरे बांधून देऊ शकणार नाही. सरकारबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार […]
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिक (PM Narendra Modi) दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे […]
Raj Thackeray on Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shri Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. दरम्यान, आज […]
Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) […]
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर मोहोळ खूनप्रकरणातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डॉक्टरने उपचार केले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित तरूणाने […]