- Home »
- Shivsena
Shivsena
शिवतारेंना शांत करण्यासाठी राष्ट्रवादीची मावळमध्ये फिल्डिंग : शिवसेनेचे कामच न करण्याचा इशारा
पुणे : माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मावळमध्ये शिवसेनेचे (Shivsena) काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना […]
अजितदादांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘शिवतारे बापूंची’ ताकद नेमकी किती?
“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डू ला जुन्या वादाची किनार असली […]
मनसेचा खरा फायदा श्रीकांत शिंदेंना होणार? ठाकरेंना सोबत घेऊन CM शिंदे मुलालाही करणार सेफ
खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध आमदार राजू पाटील. मागीच पाच वर्ष या दोघांमधील राजकीय सामना कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अत्यंत जवळून पाहिला. पाच वर्षांच्या काळात राजू पाटील (Raju Patil) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यात थोडंही जमलं नव्हतं. अगदी माज उतरविण्यापर्यंतची विधाने राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केलेली. तर “आजी पुढे माजी लावायला लावू नका”, […]
मुंडेंच्या तोडीचा नेता शरद पवारांच्या गळाला… बजरंग सोनवणेंचा अजितदादांच्या गटाला राम-राम
बीड : बीड लोकसभा मतदारसंघातील बडे नेते म्हणून ओळखल्या जाणारे बजरंग सोनावणे (Bajranag Sonawane) आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज (20 मार्च) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, सोनावणे यांना बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात […]
Video : “साताऱ्यातून आमच्या महाराजांना तिकीट मिळेल का?” प्रश्न विचारताच नंदी बैलाने डोलावली मान
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप (BJP) नेमका कोणाचा उमेदवार मैदानात असणार? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या उदयनाराजे भोसले यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या नावाची […]
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर… विजयासाठी घाम गाळावा लागणार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीमधील सर्वात अवघड ठरु शकते. एक तर दोघांनीही पक्षांमध्ये केलेले बंड, त्यानंतर पक्षनेतृत्वावर केलेले गंभीर आरोप आणि भाजपसोबत स्थापन केलेली सत्ता या दोन वर्षांमधील घटनांमुळे दोघांसाठी देखील ही निवडणूक नैतिकता सिद्ध करण्याच्या दृष्टीने […]
40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? शिंदेंनी अॅक्टिंग करुन सांगत खिल्लीच उडवली
Eknath Shinde On India Alliance : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यापासून देशासह राज्यातील विविध जिल्ह्यांत टप्प्यांमध्ये निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) ‘अबकी बार चारसो पार’चा नारा देण्यात येत आहे. तर राज्यातील विरोधी पक्षांकडून महाराष्ट्रातील 48 पैकी 40 पेक्षा अधिक जागांवर विजय निश्चित […]
‘उद्धव ठाकरेंना पत पाहूनच संधी’; एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या वेळेवरुनही डिवचलं
Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना त्यांची पत पाहूनच इंडिया आघाडीने (India Alliance) सभेत बोलण्याची संधी दिली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होताच इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांना […]
मतांसाठी ठाकरे राहुल गांधींना शरण; बदललेल्या भाषणाच्या स्टाईलवरून भाजपनं संधी साधली
Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा […]
‘शिवतीर्था’वर ‘इंडिया आघाडी’ची तोफ धडाडणार! ‘हा शिवसेनेसाठी काळा दिवस’ CM शिंदेंची बोचरी टीका
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया […]