नवीन वर्षात किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर कोण? पाहा नावे…

नवीन वर्षात किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर कोण? पाहा नावे…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी2023 नव्या वर्षातले त्यांचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. दरम्यान त्यांच्या निशाण्यावर कोण असणार आहे? याची एक यादीच त्यांनी शेअर केली आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील पाच नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरण आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी केला आहे.

नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगलो, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये सोमय्यांच्या निशाण्यावर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube