अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी… विजयानंतर मंत्री विखेंची खोचक टीका
Radhakrishan Vikhe यांनी शा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देशाची राज्यघटना बळकट आहे असं म्हणत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Radhakrishan Vikhe criticize Mamata Banergee after BJP wins Bengal : पश्चिम बंगालमधून आता जंगलराज संपले आहे . बांगलादेशी घुसखोरीमुळे पश्चिम बंगाल हे अस्वस्थ होते . बेकायदेशीर घुसखोरीला कंटाळून तेथील जनतेने ममता बॅनर्जी यांचे सरकार उखडून फेकले आहे. लोकशाहीचा निर्णय त्यांना मान्य नाही राजीनामा देणार अशी त्यांची मानसिकता. मात्र अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देशाची राज्यघटना बळकट आहे यामुळे काही फरक पडणार नाही अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण् विखे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
जगभरात तेल संकट पण भारतात अडचण नाही; काय आहे केंद्र सरकारचं धोरण?
पश्चिम बंगाल येथे निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथवून टाकले आहे. यामुळे जे घुसखोर होते ते बांगलादेशी आता परत निघाले आहे. यामुळे त्यांना देखील आता समजले आहे आपले काही स्थान राहिले नाही, देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तीला उच्चतून टाकावे लागणार आहेअशा शब्दात मंत्री विखे यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
जिल्ह्याबाहेर चारा निर्यातीला बंदी
जिल्ह्यामध्ये उन्हाची वाढती तीव्रता यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. यामुळे जिल्ह्याबाहेर चारा निर्याती याबात पाऊले उचलले जातील. याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तेथील शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे दिले जात असून त्यांनी चारा उत्पादित करावा अशा सूचना आपण दिल्या आहेत. चाऱ्याची टंचाई अद्याप तरी दिसत नाही मात्र तशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन त्यावर उपाय योजना करण्यासाठी तयार आहे.
जल जीवन योजनेबाबत अनेक तक्रारी
जलजीवन योजनेअंतर्गत ठराविक ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे पाणी असूनही काही गावांना पाणी मिळत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. पाण्याचे उद्भव नसतानाही योजनेची कामे केली. याबाबत पाणीपुरवठा सचिव यांच्याबाबत आढावा बैठक घेतली जाणार आहे. जल जीवन मिशन योजनेची अवस्था झाली आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.