ममतांचे विश्वासू ते पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारींचा थरारक राजकीय प्रवास
Suvendu Adhikari भाजपकडून पंश्चिम बंगालमध्ये पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Mamata’s confidant, first BJP Chief Minister in West Bengal Suvendu Adhikari’s thrilling political journey : पश्चिम बंगलाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. (West Bengal) येथे अखेर भाजपकडून पंश्चिम बंगालमध्ये पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 मे रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मीच घालीन; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं
एकेकाळी ममतांचे शिलेदार राहिलेले बंगाल निवडणुकीत भाजपचा मुख्य चेहरा राहिलेले पश्चिम बंगालमधील भाजपचे फायर ब्रँड नेते सुवेंदू अधिकारी ते सध्या नंदिग्राम मतदार संघातून आमदार आहेत. तर यावेळी त्यांनी नंदिग्राम आणि भवानीपूर दोन्हीही जागांवरून निवडणूक लढली आहे. भवानीपूर या ठिकाणी स्वतः ममता बॅनर्जींना त्यांनी काटे की टक्कर दिली आहे. विशेष म्हणजे अधिकारी हे मूळचे तृणमूल काँग्रेसचे आहेत भाजपमध्ये ते 2021 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी आले. तेव्हा त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना हरवलं होतं. तर यावेळी भवानीपूरमधून देखील उभे होते. त्यामुळे या मजबूत नेत्याच्या नावावर भाजपकडून पंश्चिम बंगालमध्ये पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कोण आहेत सुवेंदू अधिकारी?
अधिकारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी हे भाजपमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी २००९ ते २०२४ दरम्यान काँग्रेसचे खासदार होते आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते. त्यांचे भाऊ दिव्येंदू आणि सौमेंदू अधिकारी हेही लोकसभा सदस्य राहिले आहेत.
पूर्व मिदनापूरमधील प्रभावशाली राजकीय घराणे
सुवेंदू अधिकारी हे प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पूर्व मिदनापूर (पुरबा मेदिनीपूर) जिल्ह्यात मोठा दबदबा असून त्यांना या भागातील ‘राजकीय सम्राट’ असेही म्हटले जाते.
काँग्रेसमधून राजकीय प्रवासाची सुरुवात
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला आणि कांथी नगरपालिका येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले.
नंदीग्राम आंदोलनातून ओळख निर्माण
२००७ मध्ये नंदीग्राम आंदोलनात त्यांनी ममता बॅनर्जींसोबत नेतृत्व करत स्वतःची ‘फायरब्रँड’ नेता म्हणून ओळख निर्माण केली. त्या वेळी इंडोनेशियाच्या सलीम समूहाच्या रासायनिक प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात १४ मार्च २००७ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १४ आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्यात आला. नंदीग्राम आणि सिंगूर येथील आंदोलनांमुळे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला.
ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी
या यशानंतर सुवेंदू अधिकारी यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये तामलुक मतदारसंघातून विजय मिळवला आणि ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी बनले. २०१६ मध्ये तृणमूलच्या पुनर्विजयानंतर त्यांना राज्यात बोलावून परिवहन खात्यासह इतर महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली.
तृणमूलमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश
तृणमूल काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबतचे मतभेद यामुळे त्यांची ताकद कमी झाली. २०१९ नंतर मतभेद अधिक तीव्र झाले आणि नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करून त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली.