ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड 125 जागांसाठी भरती

ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड  125 जागांसाठी भरती

जॉब मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड या सरकारी संस्थेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेअंतर्गत एकून 125 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेय या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवक या भरतीचा तपशील दिला आहे. त्यासाठी recindia.nic.in. या संकेतस्थळाला भेट द्या. या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेल्या नोटिफिकेशमध्ये, सांगण्यात आलं की, या भरतीद्वारे महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. या नोटिफिकेशनमध्ये एकूण पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, वयोमर्यादा या बाबींचा सविस्तर तपशील दिला आहे.

या पदांच्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज बोलावण्यात आले आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या जागांसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे.

एकूण पदे – 125

पदाचे नाव आणि पदे
महाव्यवस्थापक – 03
व्यवस्थापक – 05
उपव्यवस्थापक – 06
सहाय्यक व्यवस्थापक – 07
अधिकारी – 95
सहायक अधिकारी – 06
उपमहाव्यवस्थापक – 02
मुख्य व्यवस्थापक – 01

शैक्षणिक पात्रता-
उमदेवार हा सरकारी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये पदवी – B.tech किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी- M.tech धारक असावा
चार्टर्ड अकाउंटन्सी / खर्च आणि व्यवस्थापन अकाउंटन्सी
MBA/ MCA / MCS / Msc यात डिप्लोमा किंवा पदवी
LLB
(अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पाहावी)

अमृतपाल वेशांतर करुन पळाला; टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर 

वयोमर्यादा –
15 एप्रिल 2023 रोजी, 33 ते 52 वर्ष [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पगार –
महाव्यवस्थापक : 1,00,000 ते 2, 80, 000 रुपये
व्यवस्थापक : 80000 ते 220000 रुपये
उपव्यवस्थापक : 70000 ते 200000 रुपये
सहाय्यक व्यवस्थापक : 60000 ते 180000 रुपये
अधिकारी : 50000 ते 160000 रुपये
सहाय्यक अधिकारी : 30000 ते 120000 रुपये
उपमहाव्यवस्थापक : 70000 ते 200000 रुपये
मुख्य व्यवस्थापक : 90000 ते 240000 रुपये

अर्ज फी
REC लिमिटेड द्वारे आयोजित केलेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जातीचे उमेदवार, अपंग व्यक्ती, माजी सैनिक यांना अर्ज फीमध्ये सूट दिली आहे.
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस : 1000 रुपये
SC/ST वर्गातील उमेदवारांना फी नाही
पीडब्ल्यूडी/महिला या उमेदवारांना फी नाही

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

जाहिरात https://drive.google.com/file/d/1JM9IGHS1KCIALA3hoY0QwlPKuDdwVl0F/view

अर्ज करण्याची शेवटाची तारिख – 15 एप्रिल 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : recindia.nic.in.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube