Satyaji Tambe : भाजप नेत्यांच्या संस्थेत तांबेंना पाठिंबा, नेत्यांची भूमिका चर्चेत
धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Elections) भाजपनं (BJP)अद्यापही कोणालाच पाठिंबा दिला नसला तरी शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडलाय. भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे (Tushar Randhe) हे स्वत: व त्यांच्या संस्थेचे कर्मचारीही मेळाव्यात सक्रीय सहभागी झाले.
भाजपची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे पण नेते मात्र तांबेंच्या पाठिशी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.शिरपूर येथील माजी शिक्षणमंत्री व भाजपचे विधान परिषद सदस्य अमरीश पटेल यांच्या संस्थेत मंगळवारी 24 जानेवारीला सायंकाळी सत्यजित तांबे यांची प्रचारसभा झाली. पटेल यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांचे सर्व प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. त्यांच्यासोबतच तुषार रंधे यांच्या किसान विद्या प्रसारक संस्थेतील कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
रंधे यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी तांबे यांच्या विजयासाठी आवाहनही केलंय. तांबे यांनी आपल्या उमेदवारीची पार्श्वभूमी सांगून आगामी उद्दिष्टांबाबत माहिती दिली. सभा आटोपल्यानंतर त्यांनी राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. उपस्थित संस्थाचालकांनीही आमचे तांबे कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध, डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी प्रत्येक घटकास केलेलं सहकार्य यामुळं तांबे यांना पाठिंबा देत असल्याचं सांगितलं.
आपण डाव्या विचारांचे सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत पब्लिक पॉलिसी या विषयांतर्गत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार केल्याची माहिती दिली. ट्रंप यांचा पक्ष आपल्याकडच्या भाजपप्रमाणं उजव्या विचारांचा आणि मी डाव्या विचारांचा पण विरोधी पक्ष कसे काम करतो? हे पाहण्यासाठी शिक्षकांच्या आज्ञेवरुन त्यांच्यासाठी काम केल्याचं तांबे यांनी सांगितलंय.