आजपासून महाराष्ट्र्र केसरी सुरु होतीय, पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली होती ?

  • Written By: Published:

कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्ती मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’. आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे 62 वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होणार आहे.

10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 900 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवणार आहेत. हा सगळ्यात कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी हा मुद्दा आहेच पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ? नसेल माहित तर हेच आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube