बहिणींना 3500 रुपये, मोफत शिक्षण अन् जातनिहाय जणगणना; ‘वंचित’चं जाहीरनाम्यातून आश्वासन
Vanchit Bahujan Aaghadi : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचाराचा धुमधडाका सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aaghadi) स्वबळावर उडी घेतली असून निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलायं. जाहीरनाम्याला वंचितकडून ‘जोशाबा समतापत्र’ असं नाव देण्यात आलं असून जाहीरनाम्यात ओबीसी-मराठा आरक्षणापासून जातिनिहाय जणगणनेचा मुद्दा मांडण्यात आलायं. यासंदर्भात वंचितकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आलीयं.
जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी जाहीरनाम्याचे प्रकाशन नेते @Prksh_Ambedkar यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष @DishaShaikh7 व पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे… pic.twitter.com/hRsqz3wVvy— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 5, 2024
वंचितच्या जाहीरनाम्यात कोण-कोणते मुद्दे?
-धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे!
-बोगस आदिवासींचे दाखले रद्द करू, हक्काच्या वन जमिनींचे वाटप करु
-जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावनी करण्यात येईल
-ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे ठेऊ.
-मोहम्मद पैगंबर बिल विधी मंडळात मंजूर करू
-महिलांना मिळणार मासिक 3500 रुपये वेतन
-शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करणार
-सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्यांना मनरेगाकडून 5 रुपये अनुदान
-40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पारलिंगी व्यक्तींना 5 हजार रुपये
-नवीन उद्योगांना अनुदान देऊ
-सर्वांना KG ते PG शिक्षण मोफत देणार
-प्रति महिना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत व 300 युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत
-अंगणवाडी सेविकांना, आशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा
-गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करु
-बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल
-बेरोजगार सुशिक्षित तरुण तरुणींना 2 वर्षापर्यंत 5 हजार रुपये वेटिंग पिरियड भत्ता
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, अशी मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्यांक समूहासाठी धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, महिलांना 3500 रुपये मासिक वेतनसह वर्षात तीन सिलेंडर मोफत देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.