मोठी बातमी! सुनील टिंगरेंना धक्का, वडगाव शेरीतून बापूसाहेब पठारे विजयी

Maharashtra Assembly Election : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र

  • Written By: Published:
Bapusaheb Pathare

Maharashtra Assembly Election : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजय झाले आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरेचा पराभव केला आहे. चुरशीच्या लढतीमध्ये बापूसाहेब पठारे यांनी बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवार यांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बाजी मारणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पुन्हा एकदा अजित पवार यांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून अटीतटीच्या सामन्यात मैदान मारले. दिलीप वळसे पाटील 1014 मतांनी विजय झाले आहे. त्यांनी शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे कसाब विधानसभा मतदासंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

follow us