भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांनी आता आमच्यासारख्या…’

  • Written By: Published:
भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांनी आता आमच्यासारख्या…’

Raj Thackreray On Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elction) तोंडावर महायुतीला (Mahayuti) मोठा झटका बसला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाचा (Ajit Pawar) राजीनामा दिला असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी समीर भुजबळांवर खोचक टीका केली होती. राजकारणात सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असं ते म्हणाले होते. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं.

31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, दिवाळी नेमकी कधी साजरी करायची? शंकराचार्यांनी स्पष्टच सांगितलं, घ्या जाणून 

राज ठाकरे एका वृत्त वाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल असा असं भाकीत देखील राज ठाकरेंनी वर्तवलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं सुचक विधान केलं.

Vidhasabha Election : अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली, नामसाधर्म्याचा कोणाला बसणार फटका? 

यावेळी त्यांना छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबतही विचारले असता ते म्हणाले की, छगन भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना सोबत घेऊन एक पक्ष काढावा, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, खरं तर छगन भुजबळ हे देखील पुतण्याबरोबरच पक्षातून बाहेर पडले. ते काकांबरोबर राहिले नाहीत. त्यांनी तरी किमान काकांना सोडायला नको होतं, असे राज ठाकरे म्हणाले.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?
समीर भुजबळांच्या बंडखोरीबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असं वाटालया लागलं. शरद पवार यांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या अशी अनेक पुतणी कंपनी आहे, हे सर्व काकांचं ऐकतात असं वाटत नाही. त्यामुळे राजकारणातील सगळ्या पुतण्यांचा डीएनए एक वेगळाच डीएनए आहे, असे भुजबळ म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube