जगतापांना आमदार नाही, ‘नामदार’ म्हणून निवडून द्या, नगरकरांचं एकमुखाने आवाहन
Sangram Jagtap : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचे (Mahayuti) सर्व उमेदवार मतदारसंघात जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून (Ahmednagar Assembly Elections) तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता संग्राम जगताप यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी शहरातील मार्केट यार्ड (Market Yard) संग्राम जगताप यांनी भेटी घेतल्या. या दरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी आमदारकीच्या काळात शहरात संग्राम जगताप यांनी भरीव काम केला आहे तसेच व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्याचे काम आमदारकीच्या काळात संग्राम जगताप यांनी केले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तसेच या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना आमदार नाही तर नामदार म्हणून निवडून देण्याचा आहे अशी भावना देखील यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
तसेच यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप म्हणाले की, आज मार्केट यार्ड परिसरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आले होते आणि या प्रचार फेरीमध्ये व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ही निवडणूक नगरकरांची निवडणूक आहे.
ही निवडणूक येणाऱ्या काळात नगरला चांगली दिशा देणारी निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार स्वतःची निवडणूक समजून प्रचारामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो असं महायुतीचे आमदार संग्राम जगताप म्हणाले. तसेच 20 नोव्हेंबरला मतदानाचा लोकशाहीमध्ये दिलेला हक्क सर्वांनी बजावावा अशी विनंती देखील यावेळी त्यांनी केली.