Video : सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार; वळसे पाटलांनीही दंड थोपटले

  • Written By: Published:
Video : सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार; वळसे पाटलांनीही दंड थोपटले

मंचर : महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभेत शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांचे कधीकाळचे जवळ असणाऱ्या दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) शंभर टक्के पराभूत करा असे आवाहन करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर पवारांनी केलेल्या आरोपांवर आपण सांगता सभेत जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर देणार असल्याचे महायुतीचे उमदेवार दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’

मंचरच्या सभेत पवार काय म्हणाले?

आंबेगाव मंचरमध्ये वळसे पाटलांविरोधात महाविकास आघाडीकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवारांनी वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

ते म्हणाले की, मंचर आंबेगावचा आणि माझा अनेक वर्षांचा संबंध आहे. स्व. आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला नेहमीच साथ दिली. त्यांच्या सांगण्यावरून दिलीप वळसे पाटील यांना सोबत घेत त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली. मात्र, ज्यांना संधी आणि शक्ती दिली, अधिकार दिले त्यांनी गद्दारी करत आमची साथ सोडली. त्यामुळे गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते असे म्हणत गणोजीला आता सुट्टी मिळणार नसून, वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा हे एकच आवाहन मतदारांना असल्याचे पवार म्हणाले.

Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग

सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार : वळसे पाटील

पवारांच्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना वळसे पाटील म्हणाले की, काल (दि.13) मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, यावर मी आज काही जास्त बोलणार नाही. परंतु, 18 नोव्हेंबर रोजी आपली समारोपाची सभा होईल त्यात जाहीरपणे बोलण्यात आलेल्या गोष्टींवर मी जाहीरपणे बोलल्याशिवाय राहणार नससल्याचे स्पष्ट केले.कारण या राजकारणामध्ये एक दिवस नाही तर 40 वर्ष काम केलेले आहे. या काळात चांगली कामेच करण्यावर भर देण्यात आल्याचे वळसे पाटलांनी अधोरेखित केले.

नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा; वळसे पाटलांसाठी झिरवळांची साद

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपलं पाणी खात्रीशीरपणे आपल्यालाच मिळेल की नाही असा मुख्य आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपलं डिंभ्यातलं पाणी जर नगर जिल्ह्यात जाणार असेल तर, यामुळे जे नुकसान आपलं होणार आहे ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. मात्र, सभेत पवारांनी या प्रश्नाबाबत एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे मतदारांनी यामागे काय भूमिका आहे हे समाजावून घेतलं पाहिजे.
राजकारणामध्ये अनेक गोष्टी बदलत असतात आणि त्या सर्व गोष्टी समजावून घेऊन आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे कसं पुढे जायला पाहिजे याची रणनिती ठरवणं गरजेचं असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube