पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याला तहसीलदार मिळत नाही. मिळाला तरी चार-सहा महिन्यांत त्याची बदली केली जाते. शिरूर तालुक्यातील जनतेची शेतीशी संबंधित आणि इतर सर्वच कामे खोळंबत आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ‘कुणी तहसीलदार देता का तहसीलदार, असे म्हणत शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आज विधानसभेत टाहो […]
मुंबई : दहिसर येथे काल भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. वारे यांच्यावर हल्ला इतका गंभीर आहे की त्यात त्यांना २१ टाके पडले आहेत. मात्र, तरीही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. साधी घटना म्हणून नोंद करत आहेत. ही परिस्थिती भाजपवर का आली आहे, याचा कधीतरी विचार करा. […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना आम्हाला पुन्हा लागू करावी. या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक आहेत. त्यासाठी समिती नेमण्यात येत आहे, असे आश्वासन राज्य सरकारने […]
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना याप्रसंगी कर्नाटक येथील कदमवुड जाली बॉक्समधील चंदनाची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांना G-7 हिरोशिमा शिखर परिषदेचे जपान भेटीचे निमंत्रण दिले. मोदी यांनी या निमंत्रणाचा […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांवर टीका करत असताना विधानसभेत चोरमंडळ बसले आहे, असे जाहीर भाषणात म्हटल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती स्थापन केली. या समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १५ आमदारांची नेमणूक केली. या समितीने संजय राऊत यांना हक्कभंग नोटीस बजावत उत्तर द्यायला सांगितले. मात्र, […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या पुणे शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चा सुरू आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे ते लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. परंतु, येणाऱ्या काही दिवसांत पुणे शहर भाजपमध्ये निश्चितपणे बदल होण्याचे संकेत प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आता खासदारकीची तयारी करणार की आमदारकी लढवणार याविषयी प्रश्न विचारला असता जगदीश मुळीक […]
मुंबई : राज्यात खुलेआम देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे काम सुरू आहे. हे केवळ कोणत्या एका देवस्थानबद्दल बोलत नाही. तर राज्यभरातील देवस्थानच्या जमिनीबद्दल सांगत आहे. विशेषतः गेल्या चार-पाच वर्षात हे प्रकार सुरू आहे. म्हसवड, त्रिंबकेश्वर, विटा (सांगली), बीड जिल्ह्यातील खर्डा येथील विठोबा देवस्थानच्या मालकीची जमिनी देवस्थानला इनामी दिल्या आहेत. सातबारावर देवस्थानच्या जमिनी केल्या गेल्या आहेत. तरीही […]
रत्नागिरी (खेड) : पाच मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. तेव्हा त्या सभेला उत्तर देण्याकरता म्हणून उत्तर सभा घेणार असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. या सभेचे वर्णन एका वाक्यात आणि एका शब्दात करायचं झालं तर परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि फुटलेला पेपर हा जर एखाद्या फुटीर गटाच्या हातामध्ये […]
रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार […]
नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]