रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार […]
रत्नागिरी (खेड) : कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी आदळआपट, थयथयाट केला. त्यांच्याकडे खोके आणि गद्दार हेच दोन शब्द आहेत. यापुढे ते राज्यभर […]
चंदीगड : खलिस्तान समर्थक वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी ‘ऑपरेशन अमृतपाल’ तयार केले होते. त्यासाठी २० दिवसांपूर्वी ‘ॲक्शन प्लॅन’ ठरवण्यात आला. त्यासाठी पंजाब पोलिसांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सलग आठ बैठका घेतल्या. तर सलग १२ दिवस यावर काम केल्यानंतर शनिवारी (दि. १८) प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’ राबवित अमृतपाल सिंग याच्या मुसक्या आवळल्या आहेत. वारिस […]
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत सलग दोन दिवस विमानातून एकत्र प्रवासामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (दि. १७) रोजी पहिल्यांदा गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी एकत्र विमान प्रवास केला होता. तर रविवारी (दि.१८) रोजी दुसऱ्यांदा नांदेड ते मुंबई असा महाजन-भुजबळ एकत्र प्रवास करण्याची शक्यता […]
पुणे : देशात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहे. मात्र, दोन्हीही सरकारच्या योजना या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही सरकार केवळ राजकारण करण्याच व्यस्त असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या आतमध्ये काय सुरु आहे याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळलेल. […]
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे आवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु, सरकारच्या वतीने गांभीर्याने पंचनामे केले जात नाही. त्यासाठी संपाचे कारण दिले जात आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुग्रह अनुदान मिळायला हवे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत कसलेही गांभीर्य नाही. आम्ही त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात […]
पुणे : कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा कायदेशीर चौकशी चालू झाल्यावर तेव्हा त्यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कारण चौकशी निष्पक्ष व्हावी ही त्या मागची त्यांची भावना होती. आता विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देणे […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जमखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो या कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदतपूर्व गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. बारामती ॲग्रो साखर […]
बीड : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या गावातील युवकाने लाल दिव्यासाठी नाही तर ऊसतोड कामगार असलेल्या पण बैलासारखे राबणाऱ्या माय-बापाच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी काय करता येईल. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची ठरवले. ध्येयाने झपाटून कष्ट करत अभ्यास केला. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससीमध्ये राज्यात टॉपर आला आहे. सावरगाव घाट येथील संतोष खाडे […]