Eknath Shinde : गळ्यात गळे घालणारे तुमचा गळा कधी कापतील कळणार देखील नाही

Eknath Shinde : गळ्यात गळे घालणारे तुमचा गळा कधी कापतील कळणार देखील नाही

रत्नागिरी (खेड) : कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी आदळआपट, थयथयाट केला. त्यांच्याकडे खोके आणि गद्दार हेच दोन शब्द आहेत. यापुढे ते राज्यभर सभा घेत राहतील आणि आदळआपट, थयथयाट करत राहतील. फक्त त्यांची जागा बदलेल. आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेला आहेत. परंतु, त्यांचा हिसका उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. गळ्यात गळे घालणारे तुमचाच आक दिवस गळा कापतील, हे तुम्हाला कळणार देखील नाही, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांच्यावर टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर ५ मार्चला सभा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार तसेच भाजपवर साडकून टीका केली होती. तेव्हाच शिंदे गटाच्या वतीने आम्ही १९ मार्चला याच मैदानात सभा घेऊन उत्तर देऊ, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आजच्या सभेत गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, कोणावर फायरिंग करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी याच मैदानावर फुसका आपटीबार येऊन गेला. सर्कशी बरोबर राज्यभर सभा होतील. जागा बदलत राहतील. तेच तीन शब्द आणि टोमणे ऐकायला मिळत राहतील. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी पक्ष गहाण ठेवला होता. उद्धव ठाकरे यांनी खरंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत त्यांच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला.

समोर माणसं… झाडावर माणसं… बिल्डिंगमध्ये माणसं… सगळीकडे चारी बाजूला जनसागर एकवटला आहे. आता काही लोकांनी यांच्या सभेला या कोकणातली एवढी गर्दी कशी झाली. तर कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं. बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलं. आणि बाळासाहेबांनी देखील तुमच्यावर प्रेम केलंय, हे प्रेम आपण आज या सभेतून दाखवून दिले आहे. आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. या सभेने तुम्हाला उत्तर दिलेला आहे. म्हणून आजही हा कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी आहे. शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. जो विचार आम्ही घेऊन गेलो. जी भूमिका आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाची भूमिका आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटत, असे देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube