पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) रोजी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजुरी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी […]
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंगळवारपासून (दि. १४) पुन्हा एकदा या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यात यावर एकनाथ शिंदे (EKnath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाकडून बाजू मांडून झाल्या आहेत. मात्र, अपात्र आमदारांचा (MLA) मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु, यासाठी कायद्यात […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हवाहवासा असणारा नेता आखेर भाजपमध्ये आला आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्याबरोबर मुलगा नकुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. अनंतराव देशमुख यांनी माजी पंतप्रधान […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारबरोबर कर्मचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे. मात्र, राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एक समिती स्थापन करावी अशी सरकारने भूमिका घेतली आहे. राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारबरोबर या […]
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India Flight) फ्लाईटमध्ये नशेत लगवीकांड (Uriene Case) घडल्याची घटना समोर आली होती. आता रेल्वेतही (Railway Train) असाच प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या टीटीने (TT) एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लगवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथील एक दाम्पत्य प्रवास करत असताना या महिलेच्या […]
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीकारक व्हिडीओ बद्दल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यात महिला लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचे प्रकार वाढत आहेत. जर लोकप्रतिनिधींबाबत असे प्रकार होत असतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा […]
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषण करत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील मुद्दा क्रमांक १२६ मानसिक अस्वास्थ व व्यवसनाधिनता दूर करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याबाबत आहे. तसेच १६५ वा मुद्दा हा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारका विषयीचा आहे. अर्थसंकल्पाची प्रकाशने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतात. मात्र अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पअलावर ठेवण्यात येत नाही त्यामुळे त्याबाबतचा खुलासा सरकारने करण्याची […]
मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे यांचे विश्वासू आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या अजेंड्यावर एमआयडीसीमधील (MIDC) घोटाळा हा मुख्य […]