शिंदे गटाचा मोठा नेता कुजबुजला… Bhushan Desai याने ‘एखादा कार्यकर्ता तर सोबत आणायचा होता ना’

शिंदे गटाचा मोठा नेता कुजबुजला… Bhushan Desai याने ‘एखादा कार्यकर्ता तर सोबत आणायचा होता ना’

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे यांचे विश्वासू आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या अजेंड्यावर एमआयडीसीमधील (MIDC) घोटाळा हा मुख्य विषय होता. एमआयडीसीमधील जमीन घोटाळे प्रकरणी भूषण देसाई (Bhushan Desai) आणि गिरीश पवार (Girish Pawar) हे कोण आहेत? असा प्रश्न नागपूर अधिवेशनात भाजप (BJP) आमदारांनी उपस्थित केला होता. त्यावेळी यावर चौकशी लागेल अशी शक्यता होती. पण काही कारवाई झाली नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम संपला. स्टेजवरील एक मोठा नेता पत्रकाराच्या कानाजवळ कुजबुजून गेला. “आरे याने यायच तर एखादा कार्यकर्ता तर सोबत आणायचा होता ना” अस सांगत या ठिकाणाहून निघून गेला.

दावोस प्रकरणानंतर एमआयडीसीमधील घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वेतप्रिका काढण्याची घोषणा केली होती. या सर्व गोष्टीमुळे भूषण देसाई यांच्या अडचणीत वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून भूषण देसाई यांचे भागीदार व्यवसायिक गिरीश पवार यांनी शिंदे गटाशी जुळवून घेतलं. त्याचवेळी भूषण देसाई यांचा शिंदे गटात प्रवेश होणार का अशी चर्चा होती. पण काही दिवस यावर चर्चा झाली नाही. आज अखेर भूषण देसाई यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

Bhagyashree Mote Sister Died : मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू!

भूषण देसाई हे शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा दुपारीं विधिमंडळ परिसरात सुरु झाली होती. सायंकाळी मुख्यमंत्री तातडीने शिवसेना कार्यालयात निघाले. त्यावेळी हा प्रवेश निश्चित असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. सुभाष देसाई यांचा मुलगा प्रवेश करणार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे काही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. भूषण देसाई शक्ती प्रदर्शन करतील, अशी अनेकांना अपेक्षा देखील होती. पण जेव्हा भूषण देसाई प्रवेशासाठी एकटेच आले. त्यावेळी अनेकांचा हिरमोड़ झाला होता. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम संपला. स्टेजवरील एक मोठा नेता पत्रकाराच्या कानाजवळ कुजबुजून गेला. “अरे याने यायच तर एखादा कार्यकर्ता तर सोबत आणायचा होता ना” अस सांगत या ठिकाणाहून निघून गेला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube