Assembly Constituency Result : शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला विठ्ठलराव लंघेंनी कसा भेदला?

Assembly Constituency Result : शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला विठ्ठलराव लंघेंनी कसा भेदला?

Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election Result) राज्यात धक्कादायक निकाल जाहीर झाले अनेक दिगज्जांना पराभवांना सामोरे जावे लागले. असेच चित्र नगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळाले. जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात असाच धक्कादायक निकाल समोर आला. गडाखांचा बालेकिल्ला म्ह्णून ओळख असलेल्या नेवासा मतदार संघात आघाडीचे उमेदवार तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा भाजपचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी पराभव केला. गडाखांचा पराभव होणे अशक्य असल्याने कार्यकर्ते अतिआत्मविश्वासात होते मात्र लंघे यांच्यासाठी खुद्द मंत्री राधाकृष्ण विखे हे मैदानात उतरले होते. सत्ताधाऱ्यांकडे मोठी प्रचार यंत्रणा कार्यरत असताना देखील विद्यमान आमदार व एका माजी आमदाराला पराभवाची धूळ चाखवत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी विजयाचा गुलाल उधळला. गडाखांचा बालेकिल्ला भेदणारे लंघे आहेत तरी कोण? हे आपण जाणून घेऊ

लंघे यांचा राजकीय प्रवास आपण पाहू…
विठ्ठलराव लंघे हे मूळचे नेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथील रहिवासी असून ते भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष होते. तसेच लंघे हे नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. राजकारणातील प्रवासाला सुरुवात म्हणजे 2004 मध्ये त्यांनी नरेंद्र घुले पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तर 2009 मध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र दोन्ही वेळेस अवघ्या काही मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गडाखांविरोधात निवडणूक लढवली मात्र गडाख आमदार झाल्यानंतर लंघे यांनी गडाख गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपात प्रवेश केला. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत.

तिरंगी लढतीत गडाखांना मात देत लंघे विजयी
नेवासा विधानसभा मतदार संघांमध्ये ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवार कोण ठरू शकतो यावर महायुतीकडून विचार केला जाऊ लागला. सुरुवातीला भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचेच नाव चर्चेत होते. मात्र त्याचबरोबर विठ्ठलराव लंघे व इतर भाजपचे कार्यकर्ते उत्सुक होते. मात्र मुरकुटेंना डावलून महायुतीकडून शिवसेनेला हि जागा सोडण्यात आली. अखेर शेवटच्या क्षणी विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेने तिकीट जाहीर केले. त्यानंतर लंघे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

आयुष्मानने पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय कोणाला दिलं? म्हणाला,’त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली…’

मात्र दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले गडाख यांच्याकडे मोठी प्रचार यंत्रणा होती. तसेच विजय आमचाच असणार असा आत्मविश्वास गडाखांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. मात्र लंघे यांच्यासाठी जेव्हा विखे यांची यंत्रणा जेव्हा मैदानात उतरली तेव्हा या निवडणुकीला खरी रंगत आली. अखेर विठ्ठलराव लंघे यांचे 20 वर्षांनी आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. नेवासा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठल वकीलराव लंघे पाटील यांना 95 हजार 444 मते मिळालीत तर ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांना 91 हजार 423 मते मिळालीत. अर्थातच लंघे पाटील 4 हजार 21 मतांनी निवडणूक जिंकलेत.

लोकसभेची हवा विधानसभेत जिरली
लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळवता आले होते. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर नगर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण दोन्ही मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. यामुळे लोकसभेतील विजयानंतर विधानसभा देखील सोपी झाली आहे अशा हवेत आघाडीचे नेते होते. मात्र बदलेल्या परिस्थितीचा अंदाज न घेतल्याने महायुतीने नगर जिल्हयातील अनेक दिगज्जांना धक्का देत निवडणुकीमध्ये विजय मिळवला.

जय पराजयाची कारणे…
माजी आमदार शंकरराव गडाख यांची साधी राहणीमान व थेट लोकांशी असलेली नाळ पाहता त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. मात्र मतदार संघात गडाखांनी केलेली विकास कामे निकृष्ट असल्याचे मुद्दे निवडणुकीत गाजले. विकासकांमधील भ्रष्टाचार तसेच शिंगणापूर देवस्थान आणि विविध संस्थांमधील गैरव्यवहार आदी मुद्दे महत्त्वाचे ठरले.

तर दुसरीकडे लंघे यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेने लंघे यांच्या विजयाच्या यशाला गवसणी घातली. घोडेगाव, सोनई परिसरात सचिन देसरडा यांनी मतदारांपर्यंत लंघे यांच्यासाठी महायुतीच्या जनहिताच्या योजनाची माहिती दारोदार पोहचवली. तालुक्यातील सर्व सभा, प्रचारफेर्‍या याचे नियोजन केले. स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारीपासून ते लंघे निवडणुकीत यश घेईपर्यंत देसरडा यांनी आखलेली रणनीती लंघे यांच्यासाठी लाभदायी ठरली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube