अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
कर्नाटक : कर्नाटकातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. दोन्ही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानंतर कर्नाटक सरकारकडून दोन्ही अधिकाऱ्यांची कोणतीही पोस्टिंग न देता कर्नाटक सरकारने त्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी डी रुपा मुदगील (IPS officer D Roopa) आणि आयएएस रोहिणी सिंदुरी (IAS Rohini Sindhuri) यांची बदली करण्यात आलीय. Maharashtra Politics : […]
मुंबई : घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही सोनू निगम आणि त्यांच्या त्यांच्या टीमची माफी मागितलीय, आता या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर यांनी ट्विटद्वारे आवाहन केलंय. Shri Sonu Nigam is unhurt. On behalf of the organisation team, we have officially apologised to Sonu sir […]
बुलढाणा : शेतकऱ्यांची चळवळ दाबण्याची आणि मला संपवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असल्याचा गौप्यस्फोट शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तुपकर आज पत्रकार परिषदेत बोलत होते. तुपकर बोलताना म्हणाले, विविध मागण्यांसाठी सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन काही पोलिसांनी शेतकऱ्यांची […]
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी शिंदे गटाला शिवसेना असे संबोधावे, अशी विनंती शिंदे गटाकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सजिव संजय मोरे यांनी याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. पत्रकात म्हटले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या संपादकांनी यापुढे शिंदे गटाचा शिवसेना असा उल्लेख करावा, अशी विनंती करण्यात […]
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आरएसएस यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतं. अशातच पकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदाबाबत मोठं विधान करीत टीका केलीय. आरएसएसच्या सरसंघचालक पदावर जेवढे आले त्यांनी कधीच संत तुकाराम महाराजांच्या एकाही जयंतीला हजेरी लावली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते अकोल्यात ओबीसी परिषदेत […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. कसबा पेठेतील ब्राम्हण समाज नाराज नसून नाराज असल्याचं विरोधकांकडून पसरवलं जात असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांनी उमेवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून लावण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री शिंदें […]
मुंबई : शिवसेना आमचीच असून इतर कोणत्याही मालमत्तेवर आम्ही दावा करणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून संतापाची लाट उसळत असतानाच विधीमंडळाचं कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना भवनावरही […]
पुणे : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच 20 हजारांपेक्षा कमी मते मिळाली तर कलाटेना तिकीट मागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसंतयं. आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या […]
मुंबई : उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर टीका-टिपण्या करण्यात कायमच चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेसच्या सत्तासंघर्षानंतर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारे सतत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागत असतात. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अधारे यांनी निवडणूक आयोगालाही सोडलेलं नसल्याचं दिसून आलं आहे. ज्या लोकांची संसदीय लोकशाही व […]
मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहतो अन् शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरे यांनी फसवलं असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीराजे म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा […]