अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
औरंगाबाद : टीईटी घोटाळ्यातील (TET Scam) शिक्षकांसदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सेवेत संरक्षण आणि थकीत वेतन साठ दिवसांत जमा करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती. रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. 2018 साली टीईटी परिक्षा घोटाळ्यात जवळपास 7 हजार 880 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. या […]
पुणे : येत्या 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची पुण्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान,पुण्यातील खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर कदम यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी […]
पुणे : पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी खळबळ झालीय. कसबा पोटनिवडणुकीत रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा प्रचार मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात होता. राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही मनसेचे काही पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यामुळे मनसेकडून या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली […]
अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]
अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ […]
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]
नवी दिल्ली : भारतातील काही राज्यामंध्ये भूकंप होणार असल्याची शक्यता नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इस्टिट्युटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी वर्तवली आहे. एवढंच नाहीतर पुढील काही दिवसांतील कोणत्याही वेळी हिमालीयन प्रदेशातील काही भागांत तीव्र भूकंपाची धक्के बसणार आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि नेपाळच्या पश्चिमेकडील भागांतही हे धक्के बसणार असल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]
नवी दिल्ली : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून चार खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. संसदरत्न पुरस्कारासाठी देशभरातून 13 खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित, आणि राज्यसभा खासदार फौजिया खान यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, […]
पुणे : विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आज पुण्यात धाव घेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. यावेळी त्यांनी एमपीएससी आणि राज्य सरकार यामध्ये कुठलाही समन्वय नसल्याचा आरोप केला असून एमपीएससीच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केलीय. एमपीएससीचा पॅटर्न बदलण्यासाठी पुण्यात बालगंधर्व चौकामध्ये एमपीएससीची विद्यार्थी […]
पुणे : नाना पटोले यांचं कुठं मनावर घेताय, त्यांच्यामागे मोठा व्याप असून त्या व्यापातून ते आरोप करत असल्याचा चिमटा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काढला आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज चित्रा वाघ पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा जोरदार प्रचार केला असून मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न समजून घेतले आहेत. मतदारसंघात प्रचारफेरीदरम्यान […]