राष्ट्रवादीच्या नगरच्या सभेसाठी आता धनंजय मुंडे यांची फिल्डिंग…

राष्ट्रवादीच्या नगरच्या सभेसाठी आता धनंजय मुंडे यांची फिल्डिंग…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगरच्या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी होणाऱ्या सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी करुन बीड जिल्ह्याचा ठसा उमटवणार असल्याचा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

IPL 2023 Final: अहमदाबादमध्ये फायनलपूर्वी पाऊस सुरू, सामना झाला नाही तर कोण होणार चॅम्पियन

दरम्यान, बीडमधल्या सर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. येत्या 9 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा पार पडणार आहे.

जमालगोट्यावरून अजितदादांचे शिंदेंना खडेबोल! म्हणाले, सुंसस्कृत महाराष्ट्रात…

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा महत्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सभेसाठी हजेरी लावतील, यासंदर्भातील नियोजनासाठी बीडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राहुल नार्वेकर करणार तरी काय? झिरवळांनी दिलं खोचक उत्तर

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, आपल्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे. माझी माझ्या पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून राज्यात अधिक उपयुक्तता आहे, त्यामुळे पक्ष मला लोकसभा लढायला लावणार नाही, बीड लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी व्हावे, हे आमचे लक्ष्य असून हे निश्चितच सत्य आहे, मात्र मी स्वतः उमेदवार असेल, ही चर्चा पूर्णपणे चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या बैठकीला आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार संजय दौंड, विजयसिंह पंडित, अॅड.बागल, महेबूब शेख, राजेश्वर चव्हाण, बाळा बांगर, सतीश शिंदे, नारायण शिंदे, अविनाश नाईकवाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube