- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
सत्यजित तांबेंवर भाजपचं एवढं प्रेम का?
नाशिक : पदवीधर मतदासंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेम पलटी केल्याचं दिसून आलं. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत त्यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज […]
-
सत्यजित तांबेंचा गेम, नाना पटोलेंचं एकच वाक्य…
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तांबे पिता-पुत्राकडून मोठा ड्रामा पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आलेली उमेदवारी नाकारुन त्यांनी मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, सत्यजित तांबेकडून आम्ही महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्ज दाखल […]
-
विखेंचं सत्यजित तांबेंना पाठबळ तर थोरातांसाठी धोक्याची घंटा…
नाशिक : येत्या 3 जानेवारीला होत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पार पडत असलेल्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी एक प्रकारचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सलग तीन वेळा नेतृत्व करत असलेले कॉंग्रेसचे उमेदवार […]
-
नाशिकमध्ये ड्रामा, वडिलांऐवजी सत्यजित तांबेच उमेदवार
नाशिक : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे. डॉ सुधीर तांबे यांनी याबाबत माहिती दिली असून यावेळी तांबे म्हणाले, मागील तीन वेळी मी निवडुन आलो आहे. मी आमदार असताना शिक्षकांचे सोडविण्यासाठी मी प्राधान दिलं. माझ्या माध्यमातून मी अनेक […]
-
रशियाने युद्ध जिंकण्यासाठी कमांडर बदलला…
मॉस्को : गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेनचे युध्द सुरु आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये शिरकाव करुन युक्रेनचा काही भाग युक्रेनने ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने आजूबाजूच्या राष्ट्रांची मदत घेऊ नये असं आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपण चर्चेसाठी तयार असून चर्चा करुन आपण यातून मार्ग काढू असंही म्हंटलं होतं. अशातच दोन्ही […]
-
ठाकरेंचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार? प्रमुखपदाचं पुढं काय?
मुंबई : सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सलग दुसऱ्यांदा 2018 मध्ये निवड झाली होती. आता शिवसेना पक्षाचा नवा पक्षप्रमुख कोण असणार? याची उत्सुकता शिवसैनिकांसह सर्वांनाच लागलीय. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट केलीय. आमच्या […]
-
कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, छाजेड यांच्या निधनावर पटोलेंची प्रतिक्रिया
नाशिक : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केला आहे. ते म्हणाले, छाजेड कॉंग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक सच्चा […]
-
जात पंचायतीची मनमानी! प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला दोन लाखांचा दंड…
सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे जात पंचायतीकडून जवळपास 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथं घडला आहे. कुटुंबाला दंड ठोठावण्यापासून ते सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी जातपंचायतीच्या एकूण 5 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय? साताऱ्यातील पुसेगावतील रहिवासी असलेल्या माधुरी धनु भोसले यांच्या मुलाचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबद्दल […]
-
पवारांना इथून उपटून…, गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर विषारी टीका
औरंगाबाद : मी पवारांना इथून उपटून टाकणार असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पत्रकार परिषदेत दिलंय. ते औरंगाबादमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना पवार घराण्यावर विषारी टीका केली आहे. ते म्हणाले, अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती […]
-
पहिल्या अग्निवीरांचे अहमदनगरमध्ये प्रशिक्षण सुरू
अहमदनगर : भारतातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. जवानांना येथे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत औरंगाबाद रस्त्यावरील बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आणि जामखेड रस्त्यावरील अमेमेंट इलेक्ट्रॉनिक रेजिमेंट या दोन विभागात हे प्रशिक्षण सुरू […]









