- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
कर्नाटकच्या तुरुंगातून मंत्री गडकरींना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली हकिकत
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीप्रकरणी अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा छडा पोलिसांनी लावल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणाची हकिकत मांडली. ते म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांना आलेली धमकी आम्ही गांभीर्याने घेतली असून त्या कॉलचा शोध घेण्यात आला. धमकीप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
-
कोयता गॅंग का फोयता…, अजित पवारांनी पुन्हा दिला इशारा
पुणे : कोयता गॅंग का फोयता गॅंग, मला ते चालणार नसून अशा घटना खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पुण्यात घडलेल्या घटनांवरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, पुण्यासह बारामती आणि बाहेर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्यांना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांच्यावर कोणीही […]
-
फुलेनगर ‘आरटीओ’मध्ये अग्नितांडव; दहा वाहने जळून खाक
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. ऐन मकसंक्रातीच्या दिवशी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. या आगीत तब्बल दहा वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मकरसंक्राती आणि रविवार असल्याने आरटीओ कार्यालयाला सुट्टी होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची […]
-
…म्हणून सोशल मीडियात ‘सर्जेराव’ म्हणत ट्रोल केलं जातंय
अहमदनगर : महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे जेव्हा संगमनेरला आले तेव्हा त्यांनीच सत्यजीत तांबे यांचं नाव सर्जेराव ठेवल्यासंदर्भातलं एक पत्र सत्यजीत तांबे यांनी ट्विट केलंय. ‘सर्जेराव’ नावाने ट्रोल करण्यावरुन तांबे यांनी एक ट्विट करत या नावामागचा खुलासा केला आहे. लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला […]
-
एरवी न बोलणारे वळसे पाटील तांबेंच्या डबल गेमवर बोलले…
मुंबई : एरवी कधीही न बोलणारे दिलीप वळसे पाटील सत्यजित तांबे यांच्या डबल गेमवर बोलले आहेत. ट्विट करुन त्यांनी भाजपला डिवचलंय. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल […]
-
बंडानंतर तांबे यांचे पहिले ट्विट…. काॅंग्रेसमधील बड्या मित्राला शुभेच्छा
अहमदनगर : काॅंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी काॅंग्रेस मधील मित्रांना शुभेच्छा देत आपले जुने दोर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काॅंग्रेसमधील मित्र, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बंडानंतरचे आपले पहिले ट्विट केले आहे. अर्थात या ट्विटवर तांबेना अनेकांनी ट्रोल केले आहे. काही […]
-
नाना पटोले संतापले, डॉ. सुधीर तांबेंवर कारवाईची भाषा…
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा […]
-
नाशिकमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात, दहा प्रवाशांचा मृत्यू
नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येचा अधिकृत आकड्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहित मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर झाल्याचं […]
-
जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रामनगर बंदरावरुन एमव्ही गंगा विलास ही क्रूझ बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार 200 किमीचा प्रवास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज सकाळी 10 : 30 च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील […]
-
…म्हणून बायकोच्या मागे, ट्रोलिंग करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालंय. सध्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून फडणवीस यांनी पंजाबी भाषेत गाणं गायलं आहे. या गाण्यावरुन सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना ट्रोलही करण्यात आलंय. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या लोकांना अमृता फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी ट्रोलकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालंय. […]









