- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Gautami Patil: ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’नंतर आता.., गौतमी पाटीलने केला खुलासा
पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील(Gautami Patil) गाण्यांनतर आता चित्रपटांसह वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. दोन-तीन गाण्यांनतर आता एका चित्रपटासह वेबसीरिजचं काम सुरु असल्याचं गौतमी पाटीलने सांगितलंय. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने ही माहिती दिलीय. गौतमी पाटील कोणत्या चित्रपटात(Movie) आणि वेबसीरिजमध्ये(Webseries) काम करणार आहे, त्याच्याबद्दल गौतमीने खुलासा […]
-
Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंना पाठिंबा का दिला? जिल्हाध्यक्ष साळुंखेंना कारणे दाखवा नोटीस
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेले उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. प्रदेश काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला नसताना अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. तांबेंना पाठिंबा देण्याबाबतची कारणे […]
-
‘त्या’ रात्री पोलिस अधिकाऱ्याने माझ्यासोबत.., पीडित महिलेनं सांगितला घटनाक्रम
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या पती-पत्नीला लिफ्ट मागून गाडीत बसल्यानंतर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांच्यावर गुन्हा दाखल औरंगाबाद : रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलेल्या पती-पत्नीला कारमध्ये लिफ्ट मागवून महिलेचा विनयभंग करणाऱ्या औरंगाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर औरंगाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 14 जानेवारीला रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेच्या […]
-
भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणारच; विजय ढेरेंशी चंद्रकांत पाटलांची सकारात्मक चर्चा
पुणे : भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे […]
-
Faraj Malik: नवाब मलिकांनंतर आता मुलगा फराजही अडचणीत; खोट्या व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजपचे मोहित कंबोज यांनी ट्विट करुन दिलीय. लग्न केल्याचं भासवून त्यांनी फ्रेंचच्या एका महिलेला व्हिसा काढण्यासाठीच्या प्रकरणी फराज मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फराज मलिक यांच्यासह एकूण 14 जणांवर हा गुन्हा दाखल झाल्याचं कंबोज यांनी ट्विट यांनी म्हंटलंय. Sources :- […]
-
अभिनेत्री रविना टंडन कुटुंबियांसह साईबाबांचरणी नतमस्तक
अहमदनगर : प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन या मंगळवारी शिर्डीला आपल्या परिवारासह येऊन त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. दुपारची मध्यान आरतीही त्यांनी केली. यावेळी साई संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना टंडन म्हणाल्या, साईबाबा काही न मागता देतात. मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या चमत्काराची अनुभूती […]
-
लाखो तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये आत्तापर्यंत 88 हजार 420 कोटींचे करार
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.15 हजारांच्या रोजगाराचा प्रकल्प […]
-
शिवराजला मानलं पाहिजे, उदयनराजे भोसलेंकडून शिवराजचं तोंडभरुन कौतुक
सातारा : शिवराजला मानलं पाहिजे, त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला, या शब्दांत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं कौतुक केलंय. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, […]
-
बिबट्याच्या कातडीसह नखांची तस्करी, टोळी जेरबंद
अहमदनगर : शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शेरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वन विभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसूबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापूर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याची […]
-
Satyajeet tambe : मला कोणत्याही पक्षात…, तांबेंची ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये भूमिका स्पष्ट
अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी […]









