Chinchwad By Election : नाना काटेंच्या विजयाबद्दल जयंत पाटलांचं मोठं विधान…

Chinchwad By Election : नाना काटेंच्या विजयाबद्दल जयंत पाटलांचं मोठं विधान…

पुणे : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच 20 हजारांपेक्षा कमी मते मिळाली तर कलाटेना तिकीट मागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसंतयं. आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

…तर प्रकाश आंबेडकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? स्वबळावर लढण्याचा इशारा

जयंत पाटील म्हणाले, पंतप्रधानांचे वाभाडे काढणाऱ्या बीबीसीच्या कार्यालयावर यांनी कारवाई केली मात्र, काही मिळालं नाही. बीबीसीच्या कारवाईमुळे जगभरात भाजपवर टीका झाली. त्यामुळे आता यांना इंग्लंड आणि अमेरिका बोलावणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Ashok Chavan यांच्या नावाने बनावट लेटरहेड, ‘पाळत आणि घातपाताचा संशय’

नाना काटे यांचा पराभव व्हावा म्हणून विरोधकांनी तिसरा माणूस उभा केला आहे. तिसरा उमेदवार उभा आहे तो मते खातोय त्यामुळे तुमचं मत नाना काटेंना तुम्ही मत द्या, असं आवाहनही त्यांनी केलंय. जो तिसरा उमेदवार उभा आहे, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे मते मिळाली होती. त्यांची आम्ही समजूतही काढली मात्र त्यांनी ऐकलं नसल्याचं स्पष्टीकरणही पाटील यांनी दिलंय.

Uddhav Thackeray : निवडणूक आयोग बरखास्त करा, तिथेही निवडणुका घ्या; उद्धव ठाकरे कडाडले..

उद्या जर 20 हजाराच्या कमी मते घेतली तर हा तिसरा उमेदवार तिकीट मागेल का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. स्वतंत्र्य भारतात पक्षाची चोरी झाली आहे. त्या चोरीमध्ये पक्षाचे चिन्ह पक्षाचे नाव खेचून दुसऱ्याच्या हातात देण्यात आलं. मराठी जनता हे मान्य करणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

शिवसेनेसोबत भाजपने जे केलं ते लोकांना आवडलं नाही, तुम्हाला आपल्या मतदारसंघात विजय आणायचा असेल तर महागाई, पक्षचोरी, ईडी आणि आयटीच्या छाप्याबद्दल लोकांना सांगून त्यांना जागृत करण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं आहे.

Ulhas Bapat : निवडणूक आयोगाने ‘मॅच्युरिटी’ दाखवायला हवी होती… अन्यथा ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळणार?

बाबासाहेबांची घटना टिकवायची असेल तर भाजपला विरोध करावाच लागणार असल्याचं ते म्हणाले आहेत. पंढपूर, देगलूर, कोल्हापूरला पोटनिवडणूक बिनविरोध घेतल्या. मात्र, चिंचवड आणि कसब्यातील निवडणूक बिनविरोधची मागणी केली. आम्ही पंढरपूर वगळता सर्व पोटनिवडणूक जिंकल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, विधानपरिषद जागा आपण जिंकल्यात, भाजपला दिल्लीतील सरकार वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील 48 जागा हव्या आहेत. यावरून त्यांची इतर राज्यात काय परिस्थिती असेल असा विचार करण्याचंही ते म्हणालेत.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटेंचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube