अमित शाहा कोल्हापूरला येताच शिंदे सेनेच्या दोन खासदारांचे टेन्शन वाढले

अमित शाहा कोल्हापूरला येताच शिंदे सेनेच्या दोन खासदारांचे टेन्शन वाढले

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाहा कोल्हापूरला येत असल्याने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या खासदारकीवर टांगती तलवार येते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शाहा यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटाच्या या दोन्ही खासदारांचे टेन्शन वाढल्याची स्थिती सध्या कोल्हापूरातील राजकीय परिस्थितीवरुन दिसून येतेय. त्यातच भाजपला दोन्ही जागांची अपेक्षा असणार, अशी अमित शाहा यांची अपेक्षा असणार असल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे आणखीनच या दोन्ही खासदारांचं टेन्शन वाढलंय.

जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकंगले असे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत. सेना-भाजप युतीवेळी या दोन्ही जागा लढवत होते. सध्या कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. जे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात दाखल झाले आहेत.

युतीमध्ये असताना कोल्हापूरातील दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या त्यामुळे या मतदारसंघातून भाजपने निवडणुका लढविलेल्या नाहीत. या जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपने आपला मोर्चा आता कोल्हापूरकडे वळविल्याचं दिसून येतंय. केंद्रीय मंत्री कोल्हापूरला येणार म्हटल्यावर त्यांना जिल्ह्यातून काही ना काही अपेक्षाच असणार असल्याच्या चर्चाही राजकारणात रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भूकंप होणार असल्याचं भाकीत केलंय.

Devendra Fadnavis च्या गौप्यस्फोटावर अजित पवार संतापले, ‘पुन्हा पुन्हा तेच…’

राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलंय. त्यांच हे ट्विट सध्या चांगलच चर्चेत आलंय. “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे..सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…”

Girish Bapat : व्हील चेअरवर बसून ऑक्सिजनच्या नळकांडीसह गिरीश बापट भाजपच्या प्रचारात

दरम्यान, मंत्री अमित शाहांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे असाव्यात, अशी अपेक्षा असल्याचं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलंय. तर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दोन्ही लोकसभेच्या जागा भाजप-शिंदे गट युती जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तसेच प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

अखेर भाजप आता शिंदे गटाच्या दोन खासदारांचे टेन्शन वाढविणार का? शिंदे गटाच्या दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याबाबत काही रणनीती आखणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube