भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या अयोध्या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. राम मंदिराप्रमाणेच भव्य असणार अयोध्या स्टेशन कसं आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे राम मंदीर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण आहे. काय आहे हा इतिहास? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या जागेसाठी अजित पवारांचा उमेदवार कोण असेल ? याची उत्सुकता आहे. कोल्हें विरोधात अजितदादांच्या डोक्यात असणारी चार नाव कोणकोणती आहेत ? जाणून घ्या…
इस्राईल विरुद्ध हमास युद्ध जगावर महाभयंकर असे परिणाम करत आहे. याला कारण ठरत आहेत ते हूथी बंडखोर. हूथी बंडखोर नेमके आहेत कोण? आणि त्यांच्यामुळे जगात महागाई कशी वाढणार? याबद्दल जाणून घ्या…
हिरो या सुपरहिट चित्रपटाला 40 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी चित्रपटाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आवर्जून पाहा मीनाक्षी शेषाद्री यांची Exclusive मुलाखत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला महत्वाची जबाबदारी दिली होती. मात्र आता याचं राज्य मागासवर्ग आयोगालाच गळती लागली आहे. या आयोगातील सदस्य आणि अध्यक्षांनी शिंदे-फडणवीसांवर आरोप करत राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप कोणते ते जाणून घ्या…
मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपला फटका बसतो आहे का? मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून जरांगे पाटील हे भाजप विरोधातील हवा पेटवत आहेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या दहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये आतापर्यंत तीनशे कोटीहून अधिक रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या जप्त करण्यात आलेल्या पैशांचं, सोन्याच्या दाग-दागिन्यांचं आणि मालमत्तेचे पुढे काय होतं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे याबद्दलच सोप्या भाषेत समजून घ्या.
कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. त्यामुळे राज्यातील 42 पैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना समाना करावा लागू शकतो. तर राज्यातील 7 लोकसभा आणि 32 विधानसभा मतदारसंघ कोणकोणते आहेत? याचा सविस्तर आढावा.
विधानसभा आणि विधान परिषद यांच्यातील तुलनात्मक फरक काय आहे ? तसचं दोन सभागृह म्हणजेच द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती ही अस्तित्वात कशी आली ? याबद्दल समजून घ्या.