प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रात्री त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.
पावसाने मुंबईत दोन दिवसांपासून थैमान घातलं असल्याने अनेक ठिकाणी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. आता उघड झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवारांनी नुकतीच लेट्सअप मराठीला महामुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
भारतीय संघाने विश्वकप जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून त्यांना बक्षीस म्हणून 125 कोटी रुपये देण्याची घोषणा झाली. त्याचे विभाजन कसं होणार आहे?
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी येथे गोळीबारातील घटनेचा आढावा घेतला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा आजपासून सुरू होतोय. यामध्ये अनेक विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
फ्रान्समधील निवडणुकीचा निकाल समोर आला असून कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तेथे त्रिशंकु स्थित निर्माण झाली आहे.
रायगडावर ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं.