मराठी राजभाषा दिनी लेट्सअप मराठीने एक सर्व्हे केला होता. त्यात प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय असं तुम्हाला वाटतं का? या सर्व्हेत 24 तासांत तब्बल 13 हजार जणांनी सहभाग घेत आपलं मत नोंदवलं. यापैकी 89 टक्के लोकांना वाटतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार […]
महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राजक्ता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरूतील आश्रमात दिसत आहे. तिथे तिने प्रवचनालाही हजेरी लावली होती. प्रवचनादरम्यान तिने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर सध्या जोरदार व्हायरल झालंय. […]
भगवान शंकर तसे दुर्लक्षितच…अंगाला भस्म आणि स्मशानभूमीत वास असणारी देवता अशी ओळख… आणि त्यामुळेच हिंदू कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात तुलनेने कमी प्रमाणात दिसणारी देवता, हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आली ती आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे. आसाम सरकारने सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर डाकिनीमध्ये असल्याचा दावा केलाय. या दाव्यानंतर मात्र राजकारण्यांना आयताच विषय मिळालाय. कारण आतापर्यंत रोजगार, मोठ-मोठे उद्योगधंदे पळवण्यापर्यंत […]
मुंबई- समृद्धी महामार्गानंतर (Samruddhi Mahamarg) आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. समृद्धीनंतर आता राज्यातल्या शक्तिपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Mahamarg)बांधला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाने रेणुका माता (Renuka Mata), तुळजाभवानी (Tuljabhavani) आणि महालक्ष्मी (Mahalaxmi) या शक्तिपीठांना जोडले जाणार […]
दुबई: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. दुबईतील (Dubai) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुशर्रफ गंभीर आजाराने ग्रस्त होते. 10 जून 2022पासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना […]
Lalita Babar : भारताची सुवर्णकन्या, मोहीची वायुकन्या म्हणून ओळख असलेली प्रसिध्द धावपटू ललिता बाबरचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ललिता बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे . अमृताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिलीय. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ललिताने जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी […]
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले […]
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय. उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी […]
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. एमसीए सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांचा क्लब गटाकडून विजय झाला. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर यांची निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रविवारी एमसीए कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला. रोहित पवारांच्या निवडीनंतर सर्वच क्षेत्रातून […]